आता 31 ऑगस्टनंतरही अर्ज करता येणार

या योजनेसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत 31 ऑगस्ट असल्याचे सांगितले जात होते. त्यामुळेच 31 ऑगस्टपर्यंत अर्ज न करू शकणाऱ्या महिलांचे काय होणार? असा प्रश्न विचारला जात होता. यावरच आता महिला आणि बालविकासमंत्री आदिती तटकरे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी 31 ऑगस्ट़ पर्यंतची मुदत ही अंतिम नाही. या योजनेसाठी अर्जाची प्रक्रिया ही निरंतर चालणार आहे. त्यामुळे 31 ऑगस्टनंतर ज्या महिला अर्ज करतील त्यांचेही अर्ज ग्राह्य धरण्यात येतील. 31 ऑगस्टनंतर अर्ज केलेल्या पात्र महिलांनी या योजनेअंतर्गत सन्मान निधी दिला जाईल, असे तटकरे यांनी 11 ऑगस्ट रोजीच स्पष्ट केलेले आहे.