३७१ कोटी पीक विमा शेतकऱ्यांच्या बँक खात्यात आला, लाभार्थी यादी पहा

👇👇 जिल्ह्यानुसार यादी येथे पहा 👇👇

 

Crop Insurance : खरीप हंगामात पिकांचा विमा उतरविणाऱ्या जिल्ह्यातील ४ लाख ३८ हजार २०३ शेतकऱ्यांपैकी नुकसान झालेल्या ३ लाख ६४ हजार ७९९ शेतकऱ्यांच्या (८३.२४ टक्के) बँक खात्यात तीन टप्प्यांत एकूण ३७० कोटी ८५ लाख रुपयांची रक्कम वर्ग केली आहे. गत खरीप हंगामात नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या व पीकविमा काढलेल्या जिल्ह्यातील ३ लाख २८ हजार ३०४ शेतकऱ्यांना विमा कंपनीकडून २५ टक्के अग्रिम म्हणून ३३०.७७ कोटी रुपये देण्यात आले होते. काही शेतकऱ्यांची पीक पडताळणी पूर्ण झाली नव्हती.

 

👇👇 जिल्ह्यानुसार यादी येथे पहा 👇👇

 

 

त्यामुळे लोकप्रतिनिधी व शेतकरी संघटनांनी केलेल्या आंदोलनामुळे प्राप्त तक्रारींची दखल घेऊन स्थानिक नैसर्गिक आपत्तीच्या माध्यमांतून वैयक्तिक तक्रारदारांना मे व जून महिन्यांत दुसरा टप्पा वितरित करण्यात आला तर अंतिम पीक कापणी प्रयोग, उत्पन्नावर आधारित निकषाद्वारे शेवटच्या व अंतिम टप्प्यात गत आठवड्यात ३६ हजार ४९५ शेतकऱ्यांना ४०.०९ कोटी रुपये वर्ग करण्यात आले आहेत. छत्रपती सांभाजीनगर जिल्ह्यात गत खरीप हंगामासाठी एकूण ४ लाख ३८ हजार २०३ शेतकऱ्यांनी आपल्या पिकाचा विमा उतरवला होता. यापैकी ८३.२४ टक्के म्हणजेच ३ लाख ६४ हजार ७९९ शेतकऱ्यांना पीकविम्याची ३७०. ८५ कोटी नुकसानभरपाई मिळाली आहे. उर्वरित ७३ हजार ४०४ शेतकरी मात्र या योजनेच्या लाभासाठी अपात्र ठरले आहेत.

 

👇👇 जिल्ह्यानुसार यादी येथे पहा 👇👇

 

 

गत हंगामामध्ये जिल्ह्यातून वैजापूर तालुक्यातील ८२ हजार ११५ शेतकऱ्यांनी पीकविमा उतरवला होता. यापैकी ९८.८४ टक्के म्हणजेच ८१ हजार १६४ शेतकऱ्यांच्या बैंक खात्यावर पीकविम्यापोटी १०५.४५७ कोटी रुपये वर्ग करण्यात आले आहेत. सोयगाव तालुक्यात २० हजार ८५७ शेतकऱ्यांनी पीकविमा उतरवला होता. यापैकी २० हजार ७८७ म्हणजेच ९९.६६ टक्के शेतकऱ्यांना ३१.१४ कोटी रुपये मिळाले आहेत Crop Insurance.

Leave a Comment