- Status बघण्यासाठी तुम्हाला दोन पर्याय दिले आहे १) मोबाइल नंबर २) रेजिस्ट्रेशन नंबर यातील कोणताही एक पर्याय निवडा.
- त्यानंतर Captcha कोड भरून Get Data बटन वर क्लिक करा. शेवटी तुमच्या स्क्रीनवर शेतकऱ्याची सर्व माहिती आणि Fund Disbursed Details येईल तुम्हाला आता पर्यंत प्राप्त झालेल्या Installment ची माहिती मिळेल.
➡️ Beneficiary Status चेक करा ⬅️
➡️ यादीत नाव पहा ⬅️
नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा चौथा हफ्ता थेट शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करण्यात आला आहे. या योजनेतून राज्यातील सुमारे 91 लाख शेतकऱ्यांना फायदा होणार असून तब्बल 1888 कोटी रुपये शेतकऱ्यांना वितरीत करण्यात आले आहेत. दरम्यान याच कार्यक्रमाच्या निमित्ताने राज्य शासनाने नुकत्याच जाहीर केलेल्या सोयाबीन-कापूस उत्पादक शेतकऱ्यांना द्यावयाच्या अनुदानाचे वितरण करण्यासाठी सुरू करण्यात येत असलेल्या पोर्टलचेही अनावरण देखील करण्यात आले. मागील वर्षीच्या अर्थसंकल्पात तत्कालीन अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नमो शेतकरी महासन्मान निधी योजना जाहीर केली होती. पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या धर्तीवर ही योजना राबवण्याची घोषणा राज्य सरकारनं केली होती. या योजनेच्या माध्यमातून प्रतिवर्षी शेतकऱ्याला 6000 रुपये देण्याची घोषणा केली होती. त्यानुसार मागील वर्षी तीन तर यंदा चौथा हप्ता देण्यात आला आहे.