महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत प्रोत्साहनपर लाभ योजनेअंतर्गत अकोला जिल्ह्यातील राष्ट्रीयीकृत बँका, व्यापारी बँका, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक व ग्रामीण बँक यांच्यामार्फत ३५,६२७ कर्जखाती योजनेच्या पोर्टलवर अपलोड करण्यात आलेली असून त्यापैकी २१,२५९ खात्यांना आजपर्यंत विशिष्ट क्रंमाक पोर्टलवर प्राप्त झाला आहे. त्यापैकी २०,७३९ खातेदार शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण करण्यात आले आहे. त्यापैकी २०,४८१ शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर लाभ एकूण ८९.३७ कोटी रुपये एवढी रक्कम बँक खात्यावर जमा करण्यात आली आहे तसेच पोर्टलवरील १४,३१७ लाभार्थी यांचा ‘ऑनहोल्ड’ यादीमध्ये असून त्यांना अपात्र दर्शविण्यात आले आहे.
महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०१९ अंतर्गत प्रोत्साहनपर लाभ योजनेमध्ये पात्र ठरलेल्या परंतु आधार प्रमाणिकरण न झालेल्या शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण करून घेण्यासाठी महा-आयटीने ७ सप्टेंबर२०२४ पर्यंत आधार प्रमाणीकरण उपलब्ध करून दिले आहे. शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण करून घेण्यासाठीचा लघुसंदेश महा-आयटीमार्फत देण्यात आला आहे. तसेच या संबंधित राष्ट्रीयीकृत बँका व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकानी देखील लाभार्थी शेतकऱ्यांना व्यक्तीशः कळविण्याबाबत संबंधित बँकांना ही सूचित करण्यात आले आहे.